** अस्तित्व **

Started by श्री. प्रकाश साळवी, June 23, 2016, 06:36:13 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

**   अस्तित्व   **
तुझं नसणं माझ्यासाठी
एक समस्याच आहे
तुझं असणं माझ्या
जिवनाचा एक भाग आहे
**
तुझं हसणं सदाबहार
एक जिवनबाग आहे
तुझं रूसणं जिवनाचे
रूक्ष वाळवंट आहे
**
तुझं माझ्यासोबत असणं
आनंदाचे ऊधाण आहे
तुझे कधितरी नसणे
मनाचे रूदन आहे
**
तुझे गाणे संगिताचे
वरदान आहे
तुझे मुक रहाणे
भावनांचे बलिदान आहे
**
तुझं असणं नसणं
मजसोबत जोडलेलं आहे
कारण तू आणि मी
आता एकच आहे
**
प्रकाश साळवी ✍