तुझं प्रेम माझं नाही !!

Started by श्री. प्रकाश साळवी, June 23, 2016, 07:07:03 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

तुझं प्रेम ! माझं नाही

तु म्हणतेस तुझं प्रेम ! माझं नाही
पण मनात तुझ्या बरंच असतं काही
शब्दांना जरब तुझ्या,
खेळतेस तू शब्दांशी
शब्द तुझे गुलाम
खेळवतेस तू प्रेमाशी
प्रेम तुझे मुळीच बेगडी नाही  ॥१॥
तुझे पण थोडे खरे आहे
प्रेम तुझं पण दुस-याचे आहे
जरी वाटलं थोडे दुस-याला
प्रेम म्हणजे काय खीरापत आहे?
असा प्रेमाचा बाजार भरवता येत नाही  ॥२॥
करावसं वाटतं तुला माझ्यासाठी
पण! बंधनांचे धागे आडवे येतात
हृदयात थोडी जागा आहे मजसाठी
पण ! सांग रितीरिवाज का तोडता येतात?
प्रेमाने प्रेम मिळते, समजते तूला सर्व काही ॥३॥
भावना माझ्या समजतेस तू ही
थोडं दूःख पण दाटते डोळ्यात तूझ्या
हेलकावे माझ्या मनाचे
जाणतेस तूही प्रितीस माझ्या
दे तुझे प्रेम थोडे, माझे थोडे प्रेम काही ॥४॥
**
प्रकाश साळवी✍