* प्रेम - एक अद्भुत प्रवास *

Started by कवी-गणेश साळुंखे, June 24, 2016, 02:18:44 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

❤ प्रेम - एक अद्भुत प्रवास  💑

प्रेम म्हणजे काय ? असं मी अजिबात विचारत नाहीये कुणाला, कारण ते समजण्यासाठी आधी प्रेमाला अनुभवावं लागतं, त्याला जगावं लागतं, ते सांगेल तसं वा-यासारखं त्याच्यासोबत कधीकधी मुक्तपणे वाहवं लागतं,तर कधीकधी त्याला एखाद्या पिंज-यातील कैद पक्ष्याला मोकळं करतो तसं त्याला त्याच्या पध्दतीने जगण्यासाठी आपल्या प्रेमपाशातुन मुक्तही करावं लागतं. कारण ते तुमच खरं प्रेम असेल तर नक्कीच तुमच्याकडे परत येईल हे मनाला माहित असतं म्हणुन याच आशेवर तर त्याला आपण या मतलबी मायावी जगात सैराट सोडलेलं असतं.
कारण बाहेरच जग कितीही लोभस सुंदर नयनरम्य असलं तरी ते आपल्या माणसांशिवाय फिकच वाटतं. सारं काही असुनसुध्दा काहीच नसल्यासारख....शेवटी तुम्ही स्वताला कितीही माडर्न हाय प्रोफाइल समजत असले तरी प्रेमाचा माञ एकच क्लास एकच स्टैंडर्ड असतो, जिथे जगत असतांना प्रत्येकाला कितीही सोयीसुविधा टेक्नोलॉजी ने उपलब्ध करुन दिल्या तरी प्रेमाची जागा त्या घेऊही शकत नाही की प्रेमाला रिप्लेस ही करु शकत नाही. म्हणुनच प्रत्येकाला प्रेमाची गरज ही निसर्गनियमानुसार लागतेच अन ते स्वाभाविकच आहे. कारण प्रेम आता मानवी जिवनाचा अविभाज्य भाग बनुन गेलाय अर्थात तो अनादीकालापासुनच आहे परंतु त्याची जाणिव ख-या अर्थाने आजच्या स्मार्ट फोन, टेक्नोलॉजी च्या जगात वेळोवेळी होऊ लागलीय...
        आधी प्रेमाची जाणिव व्हायलाच बराच वेळ निघुन जायचा आणि जेव्हा जाणिव व्हायची की Yes am in love तोपर्यंत ते प्रेम खुपच दुर निघुन गेलेलं असायचं, एकतर दुस-याच्या मिठीत नाहीतर लग्न दोन दिवसांवर येऊन ठेपलेलं असायचं... कारण कुणीतरी आपल्याला आवडतं हे मन लवकर मानायला तयार नसायच अन मानलं तर त्याव्यक्तीला तु मला आवडतेस अन माझं तुझ्यावर मनापासुन प्रेम आहे हे सांगण्याचं धाडस नसायचं...
         एकवेळ तुम्ही अशा प्रेमात पडलेल्या व्यक्तीला महाभयानक दिव्य करायला लावा अशक्यप्राय वाटणारी गोष्ट आणायला सांगा तरी हे पठ्ठे शक्य नसलं तरी ते करायला आणायला सहज तयार होतील. अगदी जीवावर बेतलं तरी... पण नेमकं प्रेम व्यक्त करतांना यांची ही ताकद कुठल्या कुठे गायब होते कुणास ठाऊक!  चांगला पैलवान गडी देखील एखाद्या सुकड्या पोरीला आपलं प्रेम व्यक्त करत असतांना लटालटा कापत असतो जणु काही तिने याला धोबीपछाडच दिलाय...  This is so called love tragedy of lovers....
         पण खरं सांगु त्यात पण एक वेगळीच मजा असते, आपलं प्रेमाला चोरुन चोरुन बघणं त्याचं लक्ष नसतांना त्याच्या एक-एक हालचालींना आपल्या डोळ्यांत साठवुन कायमच कैद करणं याची मजा काही औरच असते... तो किंवा ती जिकडे जाईल तिकडे या ना त्या बहाण्याने काम नसतांनाही जाणे स्वता आतुन कितीही वाईट असले तरी आपलं प्रेम अचानक समोर आल्यावर दिसल्यावर कुणास ठाऊक लगेच ह्रदयपरिवर्तनासोबत स्वभावबदलही होतो अशी काय जादु आहे प्रेमात जी वाईटालाही न सांगता चांगल बनवते...Love is really miracle and it's always happens when you are in love... पुढिल कहाणी लवकरच लिहणार आपण आपला अभिप्राय नक्कीच कळवा आपल्याला
❤ प्रेम - एक अद्भुत प्रवास 💑
कसं वाटतय ते...
गणेश साळुंखे.
Mob - 7715070938