सारे कळत नकळतच घडते ...

Started by santoshi.world, December 29, 2009, 01:26:54 PM

Previous topic - Next topic

santoshi.world

मन होई फुलांचे थवे गंध हे नवे कुठुनसे येती
मन पाऊल पाऊल स्वप्ने ओली हुळहुळणारी माती
मन वाऱ्यावरती झुलते, असे उंच उंच का उडते
मग कोणा पाहून भुलते, सारे क्ळत नकळतच घडते
सारे कळत नकळतच घडते.

कुणितरी मग माझे होईल हात घेउनी हाती
मिठीत घेऊन मोजू चांदण्या काळोखाच्या राती
उधळून द्यावे संचित सारे आजवरी जे जपले
साथ राहू दे जन्मोजन्मी असेच नाते अपुले
पण कसे कळावे कुणी सांगावे आज-उद्या जे घडते
जरी हवे वाटते नवे विश्व ते पाऊल का अडखळते
वाहत वाहत जाताना मन क्षितिजापाशी अडते
परि पुन्हा पुन्हा मोहरते, सारे कळत नकळतच घडते.


गीत    -    अश्विनी शेंडे
संगीत    -    निलेश मोहरीर
स्वर    -    वैशाली सामंत
मालिका -    कळत नकळत
वाहिनी -    झी मराठी

one of my fav. song :)

rudra


Kiran Mandake

मला वाटत कोणीतरी आहे जे सगळ ठरवत आणि नेमक तसाच घडत

Kiran Mandake

तुमच्याकडे माझिया प्रियाला गाणे आहे का?