हेच खरे जिवन...!!

Started by Balaji lakhane, June 25, 2016, 07:22:33 PM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

हेच खरे जिवन

*********************

सोडुन दे तु जुण्यां
रुढी परंपरा...
हेच जिवन करून
घे सुंदर जरां...!!

कोणी पाहीलं गं
मेल्यावर येतात माणसं...
तुझ्या नवऱ्याला ह्याचं
जन्मातं जप छानसं...!!

ह्याचं जिवनात तु सात
जन्माचे जिवनं करून घे सार्थ...
एेकु नको लोकांचे तु
ते तुझे जिवनं करतील व्यर्थ...!!

त्याच्या नावाचं कुंकू
लावते जन्मभरं...
करीतो तुझी काळजी
खुप प्रेम करतो तुझ्यावरं...!!

अर्ध्या जिवनात सोडू
नकोस साथ त्याची...
तुला शप्पथ आहे
तुझ्या कुंकूवाची...!!

तुझी इच्छा पुर्ण करण्यासाठी
काम करीतो दिवस रात्र...
तुझ्याचं प्रेमासाठी जगतोयं
तो मात्र...!!

***********************

कवी -गुरू
उदगीर जिल्हा लातुर
8888527304