जाताना तरी आज एकदा माझा होऊन जा ,

Started by rushi@rugvedi, June 26, 2016, 04:46:39 PM

Previous topic - Next topic

rushi@rugvedi

जाताना तरी आज एकदा माझा होऊन जा ,
शेवटच्या भेटीमध्ये आयूष्यभराची साथ तू देऊन जा,
भावनांना आवारन्याच काम माझे मे करेन,
एकदा तरी तुझा हात माझ्या हातात देऊन जा,
जाताना तरी आज एकदा माझा होऊन जा...

खूप काही साठले आहे मनात माझ्या,
ते तरी आज तू एकूण जा ,
डोळ्यात साठलेले तुझ्या प्रेमाचे भाव,
तुझ्याच त्या डोळ्यांनी वाचून जा..
जाताना तरी आज एकदा माझा होऊन जा...

कळत नकळत जन्मलेल्या ह्या नात्याला,
तुझ्या विश्वासाची साथ देऊन जा,
पुढे कधी भेटू या न भेटू
या घायाळ मनावर तुझ्या प्रेमाची फुंकर घालून जा..
जाताना तरी आज एकदा माझा होऊन जा...


Rushikesh Sonavane

9923200080

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]