माय मैनावती

Started by विक्रांत, June 26, 2016, 07:01:32 PM

Previous topic - Next topic

विक्रांत



माय मैनावती माझी
डोळे उघडे सतत
देह भावाचे गणित
आहे ओखटे सांगत

माय रडते दु:खाने
आसू डोईवरी पडे
मन गोपीचंद माझे
जागे होई थोडे थोडे

कुठे भेटेल तो सखा
चंड जालिंदर जसा
घेई अपराध पोटी
देई नाथमुद्री ठसा

काय आत मी पुरला
दिवा जाणीवेचा भला
बंधू कानिफा जिव्हाळा
कधी तारील रे मला

कळो अलक्षी गुंतली
योगी जीवनाची कला
फाटो पदर मायेचा
मरो विक्रांत थोरला

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/