पुन्हा एकदा कविता लिहेन म्हणतो..

Started by Shrikant R. Deshmane, June 26, 2016, 09:54:24 PM

Previous topic - Next topic

Shrikant R. Deshmane

पुन्हा एकदा कविता लिहेन म्हणतो,
सारे शब्द, त्या ओळी,
पुन्हा एकदा जुळवेन म्हणतो,
पुन्हा एकदा कविता लिहेन म्हणतो...

वर्ष सरली, शब्द गोठले,
मनातल मात्र मनातच अडकल,
त्याना एक नवीन दिशा दाखवेन म्हणतो,
पुन्हा एकदा कविता लिहेन म्हणतो...

मनातले भाव,कागदी उमटले,
शब्दांची जादू, बंधनात अडकले,
त्यांच एक नवीन नात जोडेन म्हणतो,
पुन्हा एकदा कविता लिहेन म्हणतो...

तू असताना, आयुष्याला अर्थ यायचा,
खूपच प्रेमळ अशी तू,
कवितेला शब्द सूचायचा,
त्यांची पुन्हा एकदा गाठ-भेट घडवेन म्हणतो,
पुन्हा एकदा कविता लिहेन म्हणतो...

लेखणी माझी, तू असावी,
दाद मात्र पहिली, तुझीच असावी,
तुझयातुनच सुरवात अन् कवितेचा शेवट करेन म्हणतो,
अन्,
पुन्हा एकदा कविता लिहेन म्हणतो...
पुन्हा एकदा कविता लिहेन म्हणतो...

-श्रीकांत देशमाने

(तीन वर्षा नंतर काही ओळी सूचल्या,
त्या मांडण्याचा छोटासा प्रयत्न..)
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]



Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]