ओळख स्वतःची

Started by Vedanti, June 27, 2016, 05:11:21 PM

Previous topic - Next topic

Vedanti

सर्व गुणांनी संपन्न आपण,
अजाण त्या गुणांपासून...

अत्यंत किंमती प्रत्येक क्षण,
बस ताब्यात असावं लागतं हे मन...

आपल्याच हाती आयुष्य संपूर्ण,
म्हणून पाऊल उचलायचं तू जपून...

असावी फक्त अस्तित्वाची जाण,
आहोत आपणही कर्तृत्ववान...

पुरेसं नाही ते ठळक दिसणं,
पण अत्यावश्यक असतं ते
स्वतःची ओळख असणं...

वेदांती
[url="http://vedantiagale.blogspot.com/"]Vedanti Agale Blogspot[/url]