* प्रेमगीत....

Started by Parth Banpatte, June 27, 2016, 06:06:00 PM

Previous topic - Next topic

Parth Banpatte

पाहता तुला इतक्या दिवसांनी,
मन माझे हे वेडे झाले,
पण दूरावताना तुझ्यापासूनी,
जगणे हे मज नकोसे झाले....


तुझ्या  हातांचे स्पर्श जे झाले,
आयुष्य माझे बहरुनी आले....
आठवताच ते स्पर्श मनाला,
क्षणात सगळे विस्मित झाले....


क्षणभरचा संवाद जो घडला,
मी प्रेमगीत जणू स्वरात गायले....
आठवताच संवाद आपला,
मन माझे जणू बहीरे झाले ....





                                      -  पार्थ बनपट्टे