ललित कुमारचे शब्द

Started by Lalit kumar, June 28, 2016, 10:18:59 AM

Previous topic - Next topic

Lalit kumar

नावाला आम्ही शिव फुले शाहू आबेंडकर पुजतो,!
वरून दिसतो सफेद आम्ही आतून काळेच असतो,!

महासत्ता झाला असता देश विचार महात्माचे चालून
विचारावर चालते कोण जो तो महात्मे वाटत असतो,!

इथे त्यांचा पुतळा हवा ह्या रस्त्याला त्यांचे नाव द्यावे
काळजात न ठेवता, निर्जीव मूर्त्या बांधत असतो,!

आंदोलन करतो नाव घेऊन आम्ही मोर्चे ही काढतो
जाती व्यवस्था मोडणाऱ्यांना जातीत ओढत असतो,!

म्हणून लल्या कधी कधी स्वतःला म्हणून जातो
देश बदलला असता, त्या आम्हीच अडथळा असतो ,!

ललित कुमार
Wapp7744881103
*********************
*बदला आता तरी महात्माच्या नावावर भांडणे सोडा त्यांना जातीत वाटणे सोडा कधी मन लाऊन त्यांचा जीवणपट वाचा त्याचे विचार वाचा तेव्हा समजश्याल महात्मा हा कोण्या जातीधर्माचा, कोण्या पक्षाचा, संस्थेचा, नाही तो अखिल भारताचा आहे असणार त्यांना मूर्तीत ठेवणे सोडा ठेवायचे तर काळजात ठेवा महात्मांना स्वतःच्या जातीची जहागीर समजने हे कडू आणि घातक, वागणे, विचार बाळगणे सोडा एक व्हा महात्मासाठी एक व्हा त्याच्या विचारांसाठी त्यांनी पाहिलेल्या सुंदर भारतासाठी एक व्हा आणि घडवा सुंदर भारत देश ,।।।।।।।*

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]