पावसात भिजताना...

Started by निखिल जाधव, June 28, 2016, 11:21:46 AM

Previous topic - Next topic

निखिल जाधव

पावसात भिजताना....

पावसात भिजताना
तूच येतोस जणू जवळ
तूही असाच ओढतोस मिठीत
अगदी जवळ अगदी जवळ

अंगाखांद्यावर हात त्याचे
कधी रेशीम कधी लागट
तूही कधी मित्र असतोस
कधी घुसळण अति चावट

बास आता म्हणूनही
तूमचा जोर संपत नाही
चिंब भिजण्याचे क्षण
किती दिवस आठवत राही

येणार येणार वाट पहात
तूम्ही दोघं येत नाही
आलात तर असे जोरात
तड तड जशी लाही

पाऊस पडून गेल्यावर
कसं छान मोकळं होतं
तू भेटून गेल्यावरही
तसंच काहीसं होतं....


:- निखिल जाधव
मो.नं. 7304090477
दिनांक : 28/06/2016
(nikhilj065@gmail.com)