॥कधी॥

Started by श्री. प्रकाश साळवी, June 28, 2016, 12:56:13 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

[ही कविता माझी जिवनसाथी अर्धांगिनिस अर्पण. कारण माझ्या यशस्वी जिवनात तिचा वाटा मोठा आहे.]

॥ कधी !!॥

पडत्या काळात माझ्या, झालिस सावली कधी !
पुसण्यास आसवे माझी, झालिस माऊली कधी !
कोमल तुझे हात, नको कष्टवू आता तरी !
काट्यात खेळताना, झालिस मददगार  कधी !
खडतर आयुष्य माझे, एक संग्राम आहे !
वार जिवावर झेलताना, झालिस तलवार कधी !
होताच खून माझ्या, सनदी तत्वादिकांचा!
चवताळून नागिण , झालिस वादळ कधी !
चुकुन आले एकदा, आनंदाला भरते कसे !
मनाचे मनाशी मिलन, झालीस एकरूप कधी !
**
प्रकाश साळवी