पाहिलेय तुला

Started by रेनी, June 28, 2016, 02:47:36 PM

Previous topic - Next topic

रेनी



पाहिलेय तुला हसताना
मुखवटा घालून स्वतःला फसवताना

पाहिलेय तुला रडताना
आपल्याच माणसाचे मुखवटे फाडताना

पाहिलेय तुला चिडताना
वचनांचे अर्थ बदलताना

पाहिलेय तुला आनंदी होताना
दुःखांना समजून त्यांना समज देताना

पाहिलेय तुला जिद्दी बनताना
नश्वरतेत ईश्वर शोधताना

पाहिलेय तुला शांत होताना
शेवटी सत्य स्वीकारताना


Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]