पावसाळा

Started by पल्लवी कुंभार, June 28, 2016, 03:11:46 PM

Previous topic - Next topic

पल्लवी कुंभार

लागल्या आसेने पुसले नियतीला
यंदाचा मासही कोरडा का होता

धगधगत्या जमिनीने टाहो फोडला
सरता आषाढही रिताच गेला

सळसळत्या वाऱ्याने पाचोळा वाहिला
मनावरची काजळी पुसून काढत गेला

टपटपत्या थेंबांचा खेळ प्रारंभला
या घडीला डाव उशिराने रंगला

रपरप पावसाने फेर हा धरला
ओसाड सृष्टीला न्हाऊ घातला

जरी कोरडा तू आज बरसला
कालचाच "पावसाळा" आम्ही पुन्हा पाहिला

~ पल्लवी कुंभार

Shrikant R. Deshmane

जरी कोरडा तू आज बरसला
कालचाच "पावसाळा" आम्ही पुन्हा पाहिला

chan aahe...
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Vedanti

[url="http://vedantiagale.blogspot.com/"]Vedanti Agale Blogspot[/url]

niteshk

फारच सुंदर