सांग कधी

Started by रेनी, June 28, 2016, 04:08:19 PM

Previous topic - Next topic

रेनी

सांग कधी येणार तू
तुझ्याच आठवणी कधी जगणार तू

तोड आज प्रत्येक पहारा
बंधनांना दे भीतीचा शहारा

घाल जुन्या रितींवर नवा प्रहार
नात्यात मान्य कर स्वतःची हार

आता नको मागे वळून पाहूस
बरस जणू आतुर पाऊस

रंगाला दे रंग  गंधाला दे गंध 
दाखवून दे तुटत नाही खरे बंध

सांग कधी हे घडणार सारे
जलोष कराया उभे वादळ वारे