पाऊसकवी

Started by गणेश म. तायडे, June 28, 2016, 04:32:54 PM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

पावसा पावसा ये
तुला कवितेत लिहितो...
कडव्यांमध्ये सजवतो
शब्दांमध्ये अडवतो
यमक ढगांशी जुळवतो
चाल सरींची बसवतो
पावसा पावसा ये
तुला कवितेत लिहितो...
कवितेत तु बरसं
ढगांच्या गडगडाटात
कल्पनेत वाहून जा
विजेच्या कळकळाटात
पावसा पावसा ये
तुला कवितेत लिहितो...
संधी विग्रह अलंकार
सरींना आज शिकवितो
होऊनी पाऊसकवी मी
शब्दांत तुला भिजवतो
पावसा पावसा ये
तुला कवितेत लिहितो...

- गणेश म. तायडे,
   खामगांव
  ganesh.tayade1111@gmail.com

Shrikant R. Deshmane

wahh wahh kyaa baat, masta..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

k.suhas

होऊनी पाऊसकवी मी
शब्दांत तुला भिजवतो
पावसा पावसा ये
तुला कवितेत लिहितो..

khup sundar Ganesh Sir
प्रा.सुहास काकडे
9272321306
suhas.kakde@gmail.com