प्रेम करायचचं राहून गेल....!

Started by Ravi Padekar, June 28, 2016, 06:19:55 PM

Previous topic - Next topic

Ravi Padekar

जीवनात मागे वळून पाहताना
प्रेम करायचचं राहून गेलं....

शेवटच्या पानावरचं
पुन्हा पुन्हा गिरवलेलं,
आणि शाळेतल्या बाकावर
दिला मध्ये कोरलेलं
तिचं नाव खोडायचचं राहून गेलं

जीवनात मागे वळून पाहताना
प्रेम करायचचं राहून गेलं....

मैत्रिण म्हणून सोबत होती,
पण विचारायच राहून गेलं.
तिच्या कडे "notbook"मागताना,
अभ्यासात मन वाहून गेलं.

जीवनात मागे वळून पाहताना
प्रेम करायचचं राहून गेलं....

पुन्हा तशी भेटली नाही
मनामध्ये ठसली नाही
करीअरकडे पाहता पाहता,
कामामध्येचं मन मोहून गेलं.
शेवटी प्रेम करायचचं राहून गेलं....

मनात कधी अशी बात नव्हती
ती आठवेल अशी कधी रात नव्हती
एकदाचं लग्न तीच होऊन गेलं
प्रेम करायचचं राहून गेलं....

जीवनात मागे वळून पाहताना
प्रेम करायचचं राहून गेलं....

कवि:-रवी पाडेकर (मुंबई)
मो:- ८४५४८४३०३४.

Shrikant R. Deshmane

शेवटच्या पानावरचं
पुन्हा पुन्हा गिरवलेलं,
आणि शाळेतल्या बाकावर
दिला मध्ये कोरलेलं
तिचं नाव खोडायचचं राहून गेलं

khup chan mandlat..
masta kavita
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Ravi Padekar