स्वर थेंबांचे

Started by शिवाजी सांगळे, June 28, 2016, 09:24:28 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

स्वर थेंबांचे

असेही रूप पावसाचे
प्रकटती भाव मनाचे!
टपटप येता स्वर थेंबांचे
जणु बोल त्वा पैंजणाचे !

तनु अलगद चिंबविता
अलवार स्पर्श श्वासांचे!
एकच उरते अस्तित्व
तेथे झरत्या पावसाचे !

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९