आनंदमय जलधारा

Started by Dnyaneshwar Musale, June 29, 2016, 01:34:54 AM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

तहानलेल दिस वंगाळ
वाणी गेल्यात
एक एक  थेंब आज
पर तीच्या वाटेनं आल्यात
आता जरा बर दिसतुया
पाणावलेल रान लई  गालात हसतुया.
रस्तेभी ओढे झालंत
पाण्यात थोडे फार निजुन गेलंत
दाराशी टीप टीप वाजतय
मनमोहक फुलपाखरू गालात लाजतय
कोमजलेली रोप हसु लागल्यात
फुलकळ्यांत आनंद दडवु लागल्यात
तळयांचा आवाज झालाय डराव डराव
तो ही ऐकण्याचा होऊ लागलाय सराव
घरातही सुटलंय वेगळंच वारं
पाऊस धारांनी बदलवलंय समदच सारं
बा ची आता गडबड झाली
सर्जा राजाची जोडी शेतात गेली
हा तो सारे खुशीत हाय
जोमाने रोवतोय शेतात पाय
नाद चिव चिमणीने  रानात धरलाय
दगडही आज पाण्याने पाझरलाय
हिरवळीच्या शालुने आज रान नटतय
आनंदी आनंद बरसणाऱ्या जलधारा वाटतय.