टिवल्या बावल्या !!!

Started by Vidya Chikne ( Mandhare ), June 29, 2016, 10:37:38 AM

Previous topic - Next topic

Vidya Chikne ( Mandhare )

टिवल्या बावल्या !!!

आज पुन्हा टिवल्या बावल्यांचा, मोह होतोय
रिमझिमणारा पाऊस, चिथावणी देतोय
मांडावा का तोच खेळ?
झेलावा का पाऊस जरा वेळ?

पुन्हा साचावी, अंगणात पाण्याची डबकी
बेडकाने टुणकन, मारावी त्यात डुबकी
होडी कागदाची, होईल त्यात हलकी
हेलकाव्यावर तिच्या, घ्यावी एक घिरकी

कारण काढून काहीतरी, घराबाहेर पडावं
झिम्मड पावसात, चिंब व्हावं
जोर वाढताच पावसाचा, घराकडे पळावं
उबदार रजईच्या, उबीला शिरावं

पुन्हा रंगावा, खेळ तोच जुना
चिखल माखले हात पाय
अन ढोपरा कोपरांवर खुणा
आईच्या धपाट्याने मग, मोडलाच समजा कणा

प्राजक्त पुन्हा बहरावा
पाऊस त्याने झेलावा
पानाफुलांत साठवावा
पाऊसओल्या फुलांनी उभा देह भिजावा

आज पुन्हा टिवल्या बावल्यांचा, मोह होतोय
रिमझिमणारा पाऊस, चिथावणी देतोय


- विद्या चिकणे ( मांढरे )
विद्या चिकणे ( मांढरे )
[url="https://www.facebook.com/vidya.chikne/"]https://www.facebook.com/vidya.chikne/[/url]

Shrikant R. Deshmane

कारण काढून काहीतरी, घराबाहेर पडावं
झिम्मड पावसात, चिंब व्हावं
जोर वाढताच पावसाचा, घराकडे पळावं
उबदार रजईच्या, उबीला शिरावं

ya goshti karnyat khup maja aahe..
khup chan..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]