व्हावी जाणिव

Started by Vedanti, June 29, 2016, 03:11:03 PM

Previous topic - Next topic

Vedanti

निघू आता या निरर्थकतेतून  ,
शोधू नवे मार्ग काही त्यातून...

नाही गरज आता भित्रेपणाची,
वेळ आहे जाणिवेची नि कर्तृत्वाची....

मग घेणार आहात ना ही जबाबदारी?

कळू देणार ना तुमचे अस्तित्व नि समजदारी?

आहे हृदयातून प्रार्थना हीच परमेश्वराला,
सदा कदा मन लागो सन्मार्गाला...

जरी आपल्यावरच आहे सर्वकाही अवलंबून,
परंतु घडते तेच ज्यास मंजूरी आहे परमेश्वराकडून....

वेदांती
[url="http://vedantiagale.blogspot.com/"]Vedanti Agale Blogspot[/url]