प्रेमात तुझ्या

Started by Ravi kamble, June 30, 2016, 02:49:59 PM

Previous topic - Next topic

Ravi kamble

प्रेमात तुझ्या..,

चातक झालो
प्रेमात तुझ्या गं
तू पाऊस होवून
भेटशील का
तहानलेल्या
आतुर मनाची
भेटीची तृषा
भागवशील का

नकोस भेटू
अवकाळीगत
रिमझिम मनी
बरसशील का
नको वाटतो
हा तुझा दुरावा
तू ढग बनून
दिसशील का

व्याकुळला गं
सखे जीव आता
भेगाळ हृदय
सांदशील का
पाऊस बनून
माझ्या जिंदगीचा
सांग दुष्काळ
घालवशील का.

रवींद्र कांबळे  9112143360
व्हाट्सप क्र .  9970291212

Shrikant R. Deshmane

व्याकुळला गं
सखे जीव आता
भेगाळ हृदय
सांदशील का
पाऊस बनून
माझ्या जिंदगीचा
सांग दुष्काळ
घालवशील का.

chan aahe raviji..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]