प्रेमाची सर...!!

Started by Balaji lakhane, June 30, 2016, 10:25:00 PM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

काळ्यानिळ्या ढगामधून येणाऱ्या सरी
तुझी माझी प्रेमाची निशानी...
पाऊसाच्या सरीत पिहीली भेट
बनली आपली प्रेम कहाणी...!!

पाऊसाच्या सरीत आपण दोघेच
जुळली आपली प्रित न्यारी...
सुसाट्याचा वारा होता बोलत
त्या संगे पाऊसाच्या सरी...!!

बेधुंद करणारा हा पाऊस
दाही दिशी आनंद फुलवणारा...
शब्द ऒठातले तिला सांगुण
तिच्या ह्रदयात समावुन जाणारा...!!

मनात तिच्या बीज पेरून
उगवतील आज अंकुर प्रेमाचे...
पाऊसात तिला मिठ्ठीत घेऊन
धागे जुळतील दोन मनाचे...!!

*******************************

कवी - बालाजी लखने (गुरु)
उदगीर जिल्हा लातुर
8888527304