" चिंतन "

Started by shashi1, June 30, 2016, 11:52:50 PM

Previous topic - Next topic

shashi1

" चिंतन "
ती हरवलेलं 'मन'
ती हरवलेलं 'ध्यान'
सदा सर्वकाळ एक 'ती'चेच चिंतन...

राहिले ना 'होश'
झालो मी 'बेहोश'
बेहोशीत ही मना एक 'ती'चेच चिंतन...

ती भासे 'निशा'
तीच चहू 'दिशा'
चराचरातल्या आशा एक 'ती'चेच चिंतन...

ती स्वर्गाची 'अप्सरा'
कोहिनुर चा ती 'हिरा'
रत्नपारखी ह्या मना एक 'ती'चेच चिंतन...

किना-याची  ती 'लाट'
ती हरवलेली 'बोट'
सैरभैर त्या पारव्या एक 'ती'चेच चिंतन...

चातकाचा ती 'ध्यास'
ती अनामिक 'आस'
लहरी त्या पावसाला  एक 'ती'चेच चिंतन...!

~ शशि..