सोन्याचा पिंजरा.............

Started by Ashok_rokade24, July 01, 2016, 09:33:59 AM

Previous topic - Next topic

Ashok_rokade24

नियतीने कसा खेळ मजसवे  मांडला,
सोन्याचा दिला पिंजरा दार नसलेला ॥
झूला चांदीचा सदा मन झूलत राहिले ,
दाणे सुवर्णाचे परी पोट रितेच राहीले ॥
निळेशार अथांग आभाळ साद नित घाली ,
झेप घेतली परी निराशाच हाती आली ॥
आभाळी स्वच्छंदी पाखरांचा खेळ चाले ,
पाहीले मी मला पंख माझे छाटलेले ॥
घ्यावी भरारी उंच आकाशी सदा वाटले
निराशा मना उमजे पंख न हे आयुष्य छाटले॥
आता आयुष्य सारे पंखा विणा जगणे ,
सोडून आस सारी पिंजरी सदा रहाणे ॥
सोडून आस सारी पिंजरी सदा रहाणे ॥

                     अशोक मु. रोकडे.
                      मुंबई.