एक अपूर्ण स्वप्न

Started by Ekraje, July 01, 2016, 10:58:28 AM

Previous topic - Next topic

Ekraje

पूर्णत्वाची पहाट न होई मन मारुनी जगतो
अजूनी एक अपूर्ण स्वप्न ह्रदयी घेवूनी जगतो

तहान आत्म्यास ह्या कशाची कळत नाही
कशासाठी मलाच मी पारखा होवूनी जगतो

दुःख भोगण्याची खरे क्षमता न आता उरली
किती वेळा जाता तिकडे परत येवूनी जगतो

अर्थ माझ्याच वेडेपणाला शेवटी का उरत नाही
साद कुणाची ऐकता नको ते का चुकूनी जगतो

विरह आक्रंदनाचे अश्रु माझ्याच वाट्याला का
कर्तव्यातून भावना गाळलेले विष पिवूनी जगतो

अंतरीचे तुझ्या शेवटी मज कळलेच नाही
जे न कळले ती घालमेल माझी समजूनी जगतो

अजब तुझी रे रचना चुकी चुकण्यार्याची नाही
किमयेत फसूनी तो भोग मोहाचे भोगूनी जगतो

कोण ते भावनांवर बंधनांचे घोळ करणारे
बंधीत तु परी स्वैर अश्रू मी लपवूनी जगतो

चल वाहितो शेवटचे हि शब्दांचे फुले तुला
कुणी न माझे मी न कुणाचा दूर जावूनी जगतो
Ekraje