पाऊस

Started by sneha31, July 01, 2016, 10:09:21 PM

Previous topic - Next topic

sneha31

थेंब एक पावसाचा देई फार सुख
बरस रे मेघना बरस आता तु
आतुरतेने तुझी वाट पाही शेतकरी
ओली कर माती तु त्यांच्यापरी

हिरव कर हे राण आता सार
तुझ्या शिवाय नाही त्यांच सौंदर्य
ईवल्याश्या हातानी बनु देत नावा
तुझ्या सरींच्या जोमानी धावु देत त्यांना

चिखलानी माखु दे जरा पाय
शेतात राबणारी तुझी वाट पाही माय
तुझ्या थेबांनी होऊ दे थंड हे अंग
डोलु दे पाखरावानी तुझ्या सरींच्या संग.

स्नेहा माटुरकर
नागपुर (भंडारा )