पूर्वेची सकाळ

Started by makarand Nalegaonkar, July 01, 2016, 11:31:15 PM

Previous topic - Next topic

makarand Nalegaonkar

पूर्वेची सकाळ छान आहे.
उगवणाऱ्या सूर्याला प्रेमाचे भान आहे.
नेहमी प्रखरतेने तापणाऱ्याला,
माझ्या प्रेमाच्या उबेचं ध्यान आहे.

पक्षांची किलबिल पुन्हा सुरु झाली
आठवणीना पुन्हा पालवी फुटली.

बिनधास्त व्हावं वाऱ्यासारख सैराट सुटाव
येणाऱ्या सगळ्या अडथळ्यांना बिनधास्त दटाव.

खत पाणी घालून पुन्हा बाग फुलवावी.
झाडी, पाने, अन फुले या बागेत पुन्हा बहरावी.


काल रात्री खरच खूप चुका झाल्या
स्वप्नांनीच माझ्या, प्रेमाच्या मयती काढल्या.

सूर्य माझ्या हातात निसटला.
पण तुलाही कधी, हात  नाही देऊ वाटला.

पूर्वेची सकाळ खरच खूप छान आहे.
उगवणाऱ्या सूर्याला प्रेमाचे भान आहे.
पूर्वी पेक्षा तो अधिक शक्तीवान आहे.
अत्म्विशावासाचा त्यात भाव आहे.