कविता तिची अन त्याची !

Started by makarand Nalegaonkar, July 01, 2016, 11:32:45 PM

Previous topic - Next topic

makarand Nalegaonkar

तो बिनधास्त वारा, ती नेहमीच विचारात बुडालेली.
त्याच जग म्हणजे ती, अन तीच म्हणजे फॅमिली.
ती न ओळखे त्याला, मात्र त्याला तिच सगळाच माहिती.
तो म्हणतो, माझ तुझ्यावर प्रेम. ती म्हणते थांब थोडा वेळ, मी ओळखत नाही अजून तुला.
त्याला तिच्या होकाराची घाई. तिला वाटे त्याने करावी मला आधी त्याची सई.
जावू द्यावा थोडासा वेळ, त्याच्या प्रेमाला ओळखण्यासाठी.
त्याच्या एका पाहण्याने ती घाबरायची, पण एकदाका होईना त्याला चोरून ती पाहायची.
त्याला नवता पडत दम, आणि ती मात्र मनातून गोंधळलेली.
तिला माहित होत, नाही जुळणार गाठ त्याची अन तिची. म्हणून नेहमीच गप्प राहिली.
शेवटी झाल्या सगळ्या भानगडी, तिच्या मनात त्याची काळजी.
रोज देवाला ती म्हणे होऊ दे सगळ त्याच्या मनासारख, सुखी  ठेव त्याला नेहमी.
त्याला वाटे तिला नाही मी आवडत, पण ती मात्र रोज एकदा तरी काढी त्याची आठवण.
तिला वाटे फिरून याने पुन्हा यावे,
असेल खर प्रेम तर लग्नाची मागणी घालावी पण तो गेला वेगळ्याच जागी तिच्या आठवणी घेऊन.
ती मात्र सगळ बघत राहिली एकदा तरी त्याची आठवण काढी.
त्याने न समजले  तिचे मन कधी, ती मात्र राहिली त्याच्या आठवणीत नेहमी.
अशी हि जगावेगळी कविता त्या दोघांची.