ती असताना आणि आता

Started by Shri_Mech, July 01, 2016, 11:53:33 PM

Previous topic - Next topic

Shri_Mech

***** ती असताना आणि आता *****

आधी, तिच्यासोबत ऐकायचो
'कसे सरतील सये माझ्याविना दिस तुझे...'
आता, झोपेचा माग लागत नाही
'एवढंच ना, एकटे जगू...' ऐकत


आधी, तिच्या सोबत फिरताना
दिवस संपलेला नव्हता कळत
आता, सोबत ती नसताना
रात्र संपताना नाही थकत


आधी, CCD मध्ये बसून
तिच्या बोलण्यात गुंतायचो
आता, 'प्यासा' मध्ये बसून
सगळं विसरायचा प्रयत्न करतो


आधी, तिच्या गोड आठवणी
मनाला गुदगुल्या करायच्या
आता, तिच्या विरहाचा दाह
जळतोय भावना मनाच्या


आधी, ती सोबत होती म्हणून
जिंदगी वाटायची फुलबागेसारखी
आता, ती दूर गेल्यापासून
जिंदगी झाली बाभळीसारखी


आधी, ती मला दाखवायची
कथा-कवितांची दिशा
आता, एकटं असताना
भावना झाल्यात नकोशा


आधी, library मधे तिच्याशी भांडायचो
'वि.स.' कि 'व.पु.' ठरवण्यासाठी
आता, बारमधे मित्रांशी भांडतोय
'JD' कि 'BP' ठरवण्यासाठी


आधी, तिला ऐकवण्यासाठी
प्रेम कविता लिहायचो
आता, दुःख घालवण्यासाठी
अश्या कविता लिहतो...

Shri_Mech
Shri_Mech