एक वृक्ष तो आज लावूया...

Started by Rajesh khakre, July 02, 2016, 09:57:04 AM

Previous topic - Next topic

Rajesh khakre

🌴एक वृक्ष तो आज लावूया🌴
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
या धरतीला चला नटवूया
एक वृक्ष तो आज लावूया

घेऊ काळजी त्याची प्रेमाने
जपुया त्यास प्राणपणाने

घालू पाणी करु संरक्षण
या श्रुष्टीचे करुया रक्षण

देईल श्वास आणि छाया
आम्हावरती त्याची माया

वृक्षाची ती किमया मोठी
त्याच्यामुळेच चाले सृष्टि

चला आज होऊ आनंदी
एक झाड़ लावूया अंगणी
©राजेश खाकरे
Mo.7875438494
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
01 जुलै 2016