देवा

Started by Ravi kamble, July 02, 2016, 09:37:06 PM

Previous topic - Next topic

Ravi kamble

*देवा..,*

सांगत नाही
कुणीच मला
देवा तुझा रे
आत्ता पत्ता
विचारायचं
आहे तुला
कुठे गेली रे
तुझी सत्ता

कुठला पक्ष
आला होता
का?
आत्ता सारखीच
होती लाट
दिसेना कुठला
देव जिवंत
का झालास
तू भुईसपाट

लहान पणापासुन
बघतोय नाटक
तुला आहेत म्हणे
चार चार हात
आला नाहीस
कधी रोखायाला
रोज मरते अत्याचारानं
इथं दलित जात

खराच आहे
जर तुझा महिमा
मग दाखव रे
आम्हा चमत्कार
एक तरी
वाचवुन दाखव
रोज होणारे
कित्येक बलात्कार

बोकड कापल्यावरच
म्हणे तू
भक्ताला नवसाला पावशी
पण कधीच दिसला
नाही का तुला
माझा शेतकरी घेताना फाशी

रोज मरती
कित्येक बाळ
इथं दुधावीना उपाशी
तुझा चांगला
चाललाय अभिषेक
नी खातोस रोज तुपाशी.

रवींद्र कांबळे 9112143360
व्हाट्सप क्र . 9970291212