सहज

Started by रेनी, July 02, 2016, 11:41:03 PM

Previous topic - Next topic

रेनी

प्रेमाला नाही शब्दांची गरज 
ते उमलते अगदी सहज, अगदी सहज

आठवणींना नसते अंतराची गरज
प्रवास करतात मनातून मनात अगदी सहज

गरजूना लागते स्पर्शाची गरज
जीवाला जीव लागतो अगदी सहज

भेट वस्तूची नाही गरज
हाथात हाथ येतील सहज

तुला नाही बोलायची काही गरज
तुझ्या डोळ्यात दिसतेय सारे अगदी सहज








Hardik