नशा धुंदीची

Started by शिवाजी सांगळे, July 03, 2016, 11:50:49 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

नशा धुंदीची

सरता पहाट जशी दवाची ओलेती
पांघरली  दुलयी फुलांनी धुक्याची

ओल्या कुंतला तुझ्या स्पर्श होता
सुगंधीत मग चढे ती नशा धुंदीची

नेत्रात दाटलेलेे अवखळ भाव ते
व्यक्त करते भावना तुज प्रेमाची

सहवास हवा जो हवासा आपला
देईल अनुभुती परमोच्च सुखाची

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

शिवाजी सांगळे

श्रीकांतजी खुप खुप धन्यवाद...
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९