हवय कुणीतरी

Started by रेनी, July 03, 2016, 02:24:12 PM

Previous topic - Next topic

रेनी

हवय कुणीतरी मला मागे वळून पाहणारे
गर्दीत माझ्या आठवणीत एकटे एकटे राहणारे

हवय कुणीतरी कागदावर माझे नाव लिहिणारे
कुणी पाहू नये म्हणून पुन्हा ते मिटवणारे

हवय कुणीतरी माझ्याशी मौनात बोलणारे
माझ्याच विचारातून सवांद साधणारे

हवय कुणीतरी चांदणे मोजणारे
तुटता तारा, फक्त मला मागणारे

हवय कुणीतरी वाऱ्यागत वाहणारे
दिसता मी, माझ्या भोवती फुलपाखरू बनणारे

हवय कुणीतरी माणुसकी जपणारे
जखम देऊन फुंकर मारणारे

https://www.facebook.com/Reni-567861266718244/


Umesh nadekar