बाबा

Started by smadye, July 03, 2016, 09:13:34 PM

Previous topic - Next topic

smadye

               बाबा

आईप्रमाणे जपतात ते असतात आपले बाबा
प्रेमाची उधळण करीत, संकटाना मात देतात बाबा

पप्पा,भाऊ, तात्या, डॅड अशी नावे आहेत अनेक
पण ईश्वराप्रमाणे सर्वामध्ये बाबा असतो एक

पहिले पाऊल पुढे टाकतो त्यांचा हात धरून
अडखळलो तरी हात  तो देतो हाकेवाचून

पडलो की आई विचारी, लागले का रे बाळा?
पण हाथ धरुनी उठण्या शिकवि बाबा आपुल्या बाळा

पिल्लाने व्हावे मोठे, ताकद  यावी पंखात
म्हणून जीवाचे रान करीत बाबा धावी सतत 

लेकरू झाले मोठे, नाव लौकिक त्याचा वाढला
लेकराचे यश पाहुनी,  तो मनी संतोष पावला

कधी रागाने, कधी समजुतीने तो मोठा करी बाळाला
पण बाळ तो मोठा झालां, आणि बाबांसी  विसरला

मुखींचा घास काढुनी, राहिला तो अर्धपोटी
तृप्तीचे ढेकर लेकाने द्यावे, हीच त्याची इच्छा मोठी

बाबा असले जीवन तू कायम जगलास
अशी कशी ही जगतरीती बाबांना मुले विसरतात?

बाळांनो  तुम्ही बाबांचे व्हा खरे मित्र
तुम्ही जेव्हा व्हाल बाबा, तेव्हा कळेल बाबांचेही  प्रेम आहे निस्वार्थ

                                      सौ सुप्रिया समीर मडये
                                     madyesupriya@gmail.com