* नव्हतंच प्रेम तुझं *

Started by कवी-गणेश साळुंखे, July 03, 2016, 11:57:49 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे


नव्हतंच जर प्रेम माझ्यावर तुझं
तर का नजर वळवुन बघायचीस
मैञिणीला घेउन गप्पांच्या बहाण्याने
मला सारखी शोधत असायचीस

नव्हतंच जर प्रेम माझ्यावर तुझं
तर का माझ्या येण्यासाठी आतुर राहायचीस
दिसलो का म्हणुन सारखं मैञिणीला विचारायचीस
दिसताच मी गालातल्या गालात हसायचीस

नव्हतंच जर प्रेम माझ्यावर तुझं
तर का मला नजरेने खुणवायचीस
केसांच्या बटा आपल्या मुद्दामच बोटांत गुंडाळायचीस
सांगना मग का तु अस वागायचीस.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938