पौर्णिमेच्या रात्री

Started by prashant prabhakar jadhav, July 05, 2016, 12:20:36 AM

Previous topic - Next topic

prashant prabhakar jadhav

पौर्णिमेच्या रात्री प्रकाश पडला होता......
प्रकाशाचा जीव जणू धरतीवर जडला होता......

चांदण्यांनी आकाशाचे अंगण सारवले होते......
त्या अंगणात जणू चंद्राचेच घर होते......

दाराजवळची तुळस आनंदाने डोलत होती......
पौर्णिमेचा आनंद ती समतेने लुटत होती......

घरावरील छप्पर मोत्यासारखे चमकत होते......
मोतीही काहीच नाही जणू हिरे लुकलुकत होते......

               लेखक: प्रशांत प्रभाकर जाधव
                           ९१६७३८१३२२

Shrikant R. Deshmane

पौर्णिमेच्या रात्री प्रकाश पडला होता......
प्रकाशाचा जीव जणू धरतीवर जडला होता......

चांदण्यांनी आकाशाचे अंगण सारवले होते......
त्या अंगणात जणू चंद्राचेच घर होते......

survat khup masta kelit prashantji..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]