* प्रेम - एक असह्य वेदना *

Started by कवी-गणेश साळुंखे, July 05, 2016, 12:19:43 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे



प्रेम सगळ्यांना मिळत नसलं तरी प्रेम माञ सगळेच करतात. प्रेमाचा अनुभव प्रत्येकजण घेतात. काहिंना तर आधीपासुनच माहिती असते की त्यांना त्यांच प्रेम कधीच मिळणार नाही तरीपण ते त्या व्यक्तीवर मनापासुन एकतर्फी प्रेम करतात जीव ओवाळुन टाकतात. आणि कधीही न मिटणा-या जखमेला उराशी बाळगुन राहतात असह्य अशा वेदनेला आपल्या डोळ्यांत कायमचा आसरा देतात सारं आभाळ कसं त्या दोन पापण्यांच्या कडात सामावुन घेतात जणु काही उधाणलेला सागरच ते आपल्या डोळ्यांत कैद करुन जगत असतात.... Nobody can hurt you badly without love...
     कुणास ठाऊक यांच्या अंगी एवढी सहनशक्ति एवढा संयम त्याग कुठुन येतो जो यांना एवढं दु:ख पचवायला शिकवतो, तरी हे लोक चेह-यावर कायम एक वेगळाच हास्यमुखवटा घेउन वावरत असतात काळजातली भळभळणारी जखमेला लपवुन आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी त्याच्या आनंदासाठी स्वताचं मन मारुन प्रेमाचा खुन करुन त्यासमोर असे वागत असतात जणु काही जगातले सगळ्यांत सुखी व्यक्ति तेच आहेत... वास्तविक त्यांच्यासारख कमनशिबी दुर्देवी या जगात कुणीच नसतं कारण त्यांनी स्वताच हसत हसत आपल्या प्रेमासाठी ते विष आनंदाने अमृत समजुन घोटघोट पिलेल असतं... One-sided Love make you happy sometime but give you pain and loneliness everytime...
      कारण या एकतर्फी प्रेमात ती व्यक्ति कायमची एकटी पडते एकाकी होते ना कुणाला आपलं बनवु शकते ना कुणाची होऊ शकते अशी दुहेरी वळणावर येते की समोर दोन दोन रस्ते असुनही ती कुठल्याही रस्त्यावर जाऊ शकत नाही इतकी बेजार लाचार होते फक्त या एकतर्फी प्रेमामुळे अन ज्या व्यक्तीसाठी त्याने एवढं काही केलंय दुखाच्या काटेरी पायवाटेला अनवाणी स्विकारलंय, कोरडे उसासे, दबलेल्या हुंदक्यांना आपलंस करुन शांत केलंय त्या व्यक्तीला याची कल्पनाही नसते की कुणीतरी आपल्यासाठी एवढंकाही केले असेल म्हणुन... आणि एकतर्फी प्रेम करणारे ते सारं काही करुन गेलेलं असतात प्रेमालाच आपलं सर्वस्व मानुन त्याच्या या असह्य वेदनेलाही मिठी मारत असतात...
@ गणेश साळुंखे.
Mob - 7715070938

Shri_Mech

ती व्यक्ती आपली होणार नाही यापेक्षा त्या व्यक्तीला आपल्या दुःखाशी काही देणं-घेणं नाही याचंच फार वाईट वाटत असतं.

इतर सर्व प्रेमाच्या नात्यांमध्ये, उदा. आई-वडिलांचं प्रेम, भाऊ-बहिणीचं प्रेम, मित्रप्रेम इत्यादी, प्रेम हे दोन्ही बाजूंनी असतं. पण एकतर्फी प्रेमात त्या व्यक्तीने आपल्याला यातून काहीही मिळणार नाही हे जाणून सुद्धा  जीव ओवाळून टाकलेला असतो. जगातील बहुतेक दुःखाचं कारण म्हणजे वियोग असतो मग जर तो एखाद्या वस्तूचा असला तर दुःख कमी असतं आणि एखाद्या व्यक्तीचा असला तर दुःख जास्त असतं. एकतर्फी प्रेम करणारा व्यक्ती कायमच दुसऱ्या व्यक्तीच्या वियोगात असतो त्यामुळे त्याला दुःखाची सवय झालेली असते. त्यामुळे जो व्यक्ती एकतर्फी प्रेमाला मिळालेल्या नकाराला पचवू शकतो तो व्यक्ती जगातलं कसलंही दुःख पचवू शकतो, त्याला काहीही गमावण्याचं भय राहत नाही.

असो, तुम्ही या विषयाची छान मांडणी केली. आपली या विषयावरची.मते पटली मला.

तुम्ही या विषयावरची संतोष माने यांची कविता वाचली किंवा ऐकली असेलच. नसेल तर नक्की ऐका, मी You Tube ची link share करतोय.

https://www.youtube.com/watch?v=OICxhnFvZzg
Shri_Mech