एकटा

Started by niteshk, July 05, 2016, 01:10:36 PM

Previous topic - Next topic

niteshk

एकटा

सादेला प्रतिसाद ना मिळे
जगात एकटाच राहिलो
सोबतीला ना येई कोणी
वाट एकटीच चाललो

जोडली नाती बरीच, खोटी
एकटा स्वप्नामागे धावलो
जाग जी कायमची आली
मला मी एकटाच सापडलो

प्रेम जे केले मी गहिरे
डोहात एकटाच उतरलो
पोळले हात यात इतके
तरी होतो एकटा गुंतलो

आधार देई ना कोणी
एकटा मी धडपडलो
घाव झेलले एकट्याने
एकट्यानेच सावरलो

मानले ज्यास जीवन माझे
त्यांस ही नकोसा जाहलो
सोडले मग सारे अलीकडे
पलीकडे एकटा पोहोचलो

दुःख ही पचविले एकट्याने
जसा सुखातही आनंदलो
एकट्याला साथ एकटेपणाची
एकट्याचे आयुष्य एकटे जगलो

स्वलिखित

shashi1


niteshk