दे धक्का...! काव्य मंत्री

Started by शिवाजी सांगळे, July 05, 2016, 07:49:34 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

दे धक्का...!

काव्य मंत्री

होणार होणार म्हणता
मंत्रीमंडळात कवी रूजु झाले,
मात्र शपथ घेता घेता
स्वतःचेच नाव विसरून गेले !

लोकसभेत आता दरवेळी
प्रश्नाला उत्तर कवितेतुन मिळेल,
विचारलाच प्रश्न माहिती साठी
तो सुध्दा मग कवितेतच असेल!

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९