***** ती परी *****

Started by Shri_Mech, July 05, 2016, 10:59:20 PM

Previous topic - Next topic

Shri_Mech

ती परी

आयुष्यात माझ्या एक परी आली
मनावरती माझ्या मोहिनी करुन गेली
तिची जादू होती इतकी प्रभावी
त्यापुढे माझी मनशक्ती कशी टिकावी


बुडून गेलो तिच्याच आठवणीत
विचार मनात तिचेच अगणित
आठवत राहतो तिचा चेहरा वारंवार
तिच्या अस्तित्वाने भरले माझे मन आवार


तिच्या किमयेने असा काही भ्रमित झालो
की तिच्या नयनात स्वतःला पाहू लागलो
सुखावह असते असे तिच्यात गुंतून राहणे
अशक्य आहे आता या पाशातून सुटणे


अगं माझी प्रिय परी
किती वाट पाहू तरी
का दुराव्याने अस्वस्थ करतेस
माझ्या मनाला अशी भुलवतेस


संयम माझा आता सुटत गं
जीव तुझ्यासाठी तुटतोय गं
प्रेम माझं स्विकारशील ना गं ?
या जन्मात माझी होशील ना गं ?

Shri_Mech
Shri_Mech