२ कॉफी ☕☕ (भाग-१)

Started by Akshay @stillwaiting4love, July 06, 2016, 12:47:38 AM

Previous topic - Next topic

Akshay @stillwaiting4love

एक ह्रुदयस्पर्शी लव्हस्टोरी
नक्की वाचा..
👉स्वतःहून शेअर कराल👈
fb- *तुझ्याविना करमेना*
@stillwaiting4love

*☕"२ कॉफी"☕*

दोन वर्ष पुर्ण झाली होती त्यांच्या प्रेम कहाणीला..💏 तो एका I.T. कंपनीत मैनेजर होता.. ती सुद्धा त्याच कंपनीत जॉब वर..🏬
पण त्यांच्या प्रेमाची सुरुवात ६ वर्षांआधी झाली होती.. त्यांच्या इंजीनीअरींग कॉलेजमध्ये..🎓
तो दूसर्या वर्षाला.. तिची पहिल्या वर्षाला एडमीशन झाली.. 🏢कॉलेज तसं मोठं असल्यामुळे तिला सर्व गोष्टी माहिती होण्यास वेळच लागला.. अशीच एकदा ती अॉफीस शोधतांना रस्ता विसरली आणि गोंधळल्यासारखी फिरू लागली.. 👦त्याची क्लासरूम तिथेच.. रेसेस असल्यामुळे तो आणि त्याचे तीन मित्र आत बसलेले..👬👬 ती दुसर्यांदा त्यांच्या क्लासरूम समोरून जात असतांना त्याचे अन् त्याच्या एका मित्राचे लक्ष तिच्याकडे गेले..😍 अन् बघताच दोघांचेही डोळे चमकले.. कारण ती होतीच इतकी सुंदर की पहिल्यांदा बघणारा विचारात पडेल..👰 इंजीनीअरींगच्या पहिल्या वर्षाला आलेली.. पण अगदी १४ वर्षांची वाटेल अशी छोटीशीच, गोल चेहरा, बारीक डोळे, छोटसं नाक, थोडे लांब भुरकट केस, गोरी.. अगदीच क्युट होती..😘 आणि तिने लावलेला चष्मा👓 तिच्या क्युटनेस मधे आणखीच भर टाकत होता..
त्यांच्या समोरून ती गेली अन् दोघांच्याही तोंडुन एकच वाक्य निघालं "काय क्युट आहे यार ती..😍" तसाच तो बोलला "मी तर पडलो तिच्या प्रेमात..😘"
लागलीच मित्रांनी चेलेंज केलं "मग प्रपोज करून दाखव..😉"
तो तसाच उठला 👮आणि हिंमतीने दाराच्या दिशेने गेला.. मित्रांना माहित होतं हा दारातुनच परत येऊन हरलो म्हणनार.. आणि त्याला सुद्धा माहित होतं.. कारण त्याची कधीच मुलींसोबत बोलायला हिंमत झाली नाही..😷
तो दारातुन परत वळनारच.. तेवढ्यात काही शब्द त्याच्या कानावर पडले..
💁"Excuse me.." त्याने बघीतलं तर तीच मुलगी त्याला आवाज देत होती.. त्याचे भान हरपले आणि पाय नकळत तिच्याकडे वळले.. "Excuse me.. तुम्ही मला Administration office कुठे आहे ते सांगाल का..?"💁
तो भानावर आला.. आणि सांगु लागला.. "समोरून पायर्यांवरून खाली उतरल्यावर.. उजवीकडे वळल्यानंतर Library समोरून थोडं दुर.. दोन....." त्याच्या लक्षात आलं ती गोंधळली आहे.. "मी तुझ्या सोबत येऊ का.??" त्याने विचारलं..
"चालेल" ती एवढंच बोलली..👫
समोर जातांना त्यांनी फक्त आपली educational details सांगीतली..👔 तिची कम्प्युटर शाखा.. अन् त्याची इलेक्ट्रॉनीक्स..📚
अॉफीस जवळ पोचल्यावर एक स्माईल देत ती म्हणाली "थँक यु सर..😊 तुम्ही माझी खुप मदत केली.."
"सर्वात आधी तु मला तुम्ही म्हणायचं बंद करशील का.." तो बोलला.. "...आणि माझं नाव अक्षय आहे."😄
"ओ..के.... मी साक्षी.." ती हसुन बोलली..😄
ती अॉफीस कडे वळली आणि तो त्याच्या क्लासरूमकडे..👮
बराच वेळ होऊन तो आला नाही म्हणून त्याचे मित्र बाहेर आले.. त्याला बघताच म्हणाले "काय रे.. पळुन गेला होतास.."
"नाही म्हटलं यार तीने.." असं बोलुन त्याने वेळ मारून नेली..👻
पण तिचा क्युट चेहरा मात्र त्याच्या डोळ्यांत बसला होता..😍
त्याने तिची आणखी माहिती काढली..📱
तिला फेसबुक वर रिक्वेस्ट सुद्धा पाठवली..📲 पण तिने एक वर्षानंतर ती बघीतली..📬
हळुहळु त्यांच्यात मैत्री तर झाली पण कॉलेजमध्ये दुरूनच Hi.. Hello.. चालायचं..👥
पण तो आता एकतर्फी प्रेमात पडला होता..
बघता बघता अडीच वर्ष गेली..
त्याचं शेवटचं सत्र आलं.. कॉलेज संपल्यावर आपली भेट होणार नाही असं त्याला माहित होतं..😒 म्हणून एकदा तिला भेटुन मनातलं सांगुन टाकायचं असं त्याने ठरवलं..😇
अन् एक दिवस त्यांची भेट झाली.. पार्कींगमधेच.. त्याने अडखळतच तिला मनातलं सांगितलं..😗
पण
ती मात्र काही न बोलताच निघुन गेली..😐
नंतर परिक्षा आली आणि त्यांची भेट पुन्हा होऊ शकली नाही..
नंतर तो एका कंपनीत जॉब वर लागल्यामुळे तो ही व्यस्त झाला म्हणून त्यांच्यात contact झाला नाही..👷

(..to be continued..)

लेख- अक्षय
fb page- तुझ्याविना करमेना
सर्च करा-@stillwaiting4love[\size]