२ कॉफी ☕☕ (भाग-२)

Started by Akshay @stillwaiting4love, July 06, 2016, 12:55:30 AM

Previous topic - Next topic

Akshay @stillwaiting4love

(..continued..)

पण अचानक एक वर्षानंतर त्यांची भेट झाली.. त्याच कंपनीत तिला जॉब मिळाला होता.. आधी तिनेच बोलायला सुरुवात केली..👸
सुट्टी झाल्यावर कंपनी समोरच्या कँटीनमध्ये भेटायचं ठरलं.. तिथे कॉफी छान मिळते असं तोच म्हणाला..☕☕
ती आली अन् दोघे एका कोपर्यातल्या टेबल जवळ बसले..
वेटर अॉर्डर घ्यायला आला.. ती बोलली "२ कॉफी" आणि चक्रावुन रोजच्या प्रमाणे त्याने म्हटलं "२ चहा"..
वेटर जे समजायचं ते समजला..
आणि खरोखरंच त्याने २ कॉफी व २ चहा आणले.. कारण पुन्हा प्रॉब्लेम व्हायला नको..☕☕☕☕
आणि या सगळ्या प्रकारामुळे त्यांच्या बोलण्याला मजेशीर सुरुवात झाली..😅
काही जुन्या गोष्टी निघाल्या.. आणि बोलताना अचानक तिने त्याला विचारलं.. "आजही प्रेम करतोस माझ्यावर..??"😦
तो शांत झाला.. पण त्याच्या डोळ्यांनी सर्व सांगितलं..😶
त्याने प्रपोज केल्यानंतर तिने खुप विचार केला होता.. "तो चांगला मुलगा आहे,, आपण आनंदात राहू.." असं तिला वाटलं होतं.. म्हणूनच तिने ती कंपनी जॉईन केली होती..👷👸
आता दोघांचेही प्रेम होते एकमेकांवर..
ते रोज सायंकाळी सुट्टी झाल्यानंतर त्याच टेबलजवळ बसायचे अन् प्रेमळ गुजगोष्टी करायचे.. वेटर रोज त्यांना २ कॉफी द्यायचा..☕☕
अशीच दोन वर्ष गेली.. त्यांनी लग्न करायचं ठरवलं..👪
सोबत जगण्याचे स्वप्नं पाहू लागले..
लग्नासाठी आई-वडीलांची संमती घेणं आवश्यक होतं.. म्हणून दोघेही weekend ला आपापल्या घरी गेले,, सोमवारला पुन्हा भेटु असं वचन देऊनच..👋
पण त्यांच्या नशीबात मात्र काही वेगळंच लिहीलं होतं..💘
तो एकूलता एक मुलगा होता.. त्याचे आई-वडील त्याला नकार करणार नव्हतेच.. पण तिच्या वडीलांनी आधी प्रेम विवाहास नकार दिला..😡 तिच्या आईने त्यांची समजुत काढली म्हणून त्यांनी तिला मुलाची माहिती विचारण्यास सुरुवात केली.. मुलगा चांगल्याच पोस्ट वर होता.. नंतर त्यांनी जाती-धर्माबद्दल विचारले.. त्यांची जात एक असुनही पोट-जात वेगळी आहे.. असं म्हणून तिच्या वडीलांनी लग्नास साफ नकार दिला..😡
तिला मात्र तिचं जग कुणीतरी हिसकाऊन घेतल्यासारखं वाटु लागलं..😭 ती रडु लागली पण तिच्या वडीलांना दया आली नाही.. तिने स्वतःला खोलीत बंद करुन घेतलं..🚪
आपण सोबत बघीतलेली स्वप्नं आता पुर्ण होणारच नाही या भीतीने तिच्या मनात विचारांनी गर्दी केली..😫
आणि स्वतःचं आयुष्य संपवायचं तिने ठरवलं..
तिने तिच्या हातांच्या नसा कापल्या..🔪 घरच्यांना समजताच तिला हॉस्पीटलमध्ये नेलं..💉🚑
तो तिला कॉल करण्याचा प्रयत्न करत होता.. पण रिंग वाजुनही कुणी उत्तर देत नव्हतं.. त्याला काही वेगळंच घडल्याचा विचारही आला नाही..🏡
सोमवारला ती भेटेल या आनंदात तो कंपनीत आला.. पण.. त्याला कळलं.. ती हॉस्पीटलमध्ये आहे..🏥
त्याचं शरीर थंड पडलं.. त्याने गाडी काढली..🚗
वेगात हॉस्पीटलमध्ये पोहोचला..
पण
तिने जीव सोडला होता..🍁
तो तिच्या जवळ गेला.. तिचा हात हातात घेतला..👫 आणि तिथेच बसला.. त्याचं मन दाटलं होतं.. शब्द फुटत नव्हते.. आणि अश्रु डोळ्यांतच गोठुन गेले..😑
...
आताही तो कधी कधी त्या टेबल जवळ बसतो.. वेटर त्याला २ कॉफी नेऊन देतो..
आणि त्या *२ कॉफी* कपात तश्याच राहतात..☕☕

लेख- अक्षय (९६७३४५५६२५)
fb page- तुझ्याविना करमेना
सर्च करा-@stillwaiting4love