सोडून जातांना एकदा तू मागे वळायचं होतं.

Started by Kunte mahadev, July 06, 2016, 09:43:07 PM

Previous topic - Next topic

Kunte mahadev

सोडून जातांना एकदा
तू मागे वळायचं होतं.....
तुझं माझं नातं
थोडं जपायचं होतं.....

पाठ फिरवली मी,
तु हाक मारायचं होतं....
लपवलेल्या अश्रुंना माझ्या
थोडं न्याहाळायचं होतं.....

काय हरवलं आहे आपल्यात ?
एकदा विचारायचं होतं....
अबोला धरला मी,
तु कारण ताडायचं होतं. ...

हसतांना मला बघुन ,
तु जरा गोंधळायचं होतं
एक हुंदका मी जपला,
तु ओळखायचं होतं....

स्वार्था पुरतीचं प्रेम माझं,
हे ही खरंच होतं....
पण स्वार्थातल्या या प्रेमात
एक "प्रेम" तेवढंच मुद्याचं होतं....

मार्ग आपले वेगळे, हे तर
शेवटी होणारच होतं...
स्वीकारायचं कसं.... हेच फक्त
कळत नव्हतं...

काळीज मी आणि ठोका तु एवढच
मला म्हणायचं होतं....
तुझं माझं नशीब, त्याने असच
का लीहायचं होतं....??
कवी~महादेव कुंटे मो, 9075197777

Kunte mahadev

तुमच्या भावना
प्रेमाला मिळेल प्रेमानेच उत्तर
असं काही सांगता येत नाही
तुमच्या विरहाला समजेल हरएक
असं काही सांगता येत नाही

तुमच्या भावना ओळखेल प्रत्येक
असं काही सांगता येत नाही
मनाची संवेदना जाणेलच कुणी
असं काही सांगता येत नाही

दुःखाचा दाह अनुभवेल कुणी
असं काही सांगता येत नाही
तुमच्या श्वासात जगेल प्रत्येक
असं काही सांगता येत नाही

तुम्ही आणि तुमचे विश्व एक
तुमच्यासाठी जरी अलौकिक
या विश्वात रमेलच कुणी
असं काही सांगता येत नाही
कवी~महादेव कुंटे मो 9075197777

Kunte mahadev

तुमच्या भावना
प्रेमाला मिळेल प्रेमानेच उत्तर
असं काही सांगता