आभास

Started by रेनी, July 07, 2016, 12:39:59 AM

Previous topic - Next topic

रेनी

देतात फसवे आभास
असतात ती माणसे खास

कुणावर ठेवावा भरवसा
तोडून गेला प्रत्येकजण मनाचा आरसा

दिले आभासाला मनाचे मी रंग
रंगहीन होऊन त्याने केले मला दंग

कधी देतात होकार कधी नकार
घेऊन जगतात मनाचा हा विकार

संपलाय नुकताच जुना आभास
वेदना घुटमळतेय आसपास

थोडासा आज मी ही चुकलोय
एक नाते तोडून आभास बनतोय


https://www.facebook.com/Reni-567861266718244/