प्रेम करावे...

Started by गणेश म. तायडे, July 07, 2016, 08:51:15 AM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

प्रेम करावे
जिव जळावे
स्पर्श अलगद
होऊन जावे
झोप उडावी
स्वप़्न पडावे
पाखरू होऊन
उडून जावे
आठवणीत कुणाच्या
हरवून जावे
हृदयी कुणाच्या
स्वतःस पहावे
श्वास कुणाचा
होऊन जावे
हातात हात
कुणास द्यावे
मिटून लोचने
वाहून जावे
सुखात हसावे
दुःखात जपावे
एकमेकांत
विरघळून जावे

-गणेश म. तायडे
   खामगांव
  ganesh.tayade1111@gmail.com