तो

Started by रेनी, July 07, 2016, 12:03:38 PM

Previous topic - Next topic

रेनी

मी  भडभडा बोलतो त्याच्याशी जीव एकटवून
तो बनतो तटस्थ किनारा उथळ नदीला पाहून

मी  खऱ्याचे खोटे अन खोट्याचे खरे करतो
अंधारात आणि प्रकाशात तो फक्त सत्य शोधतो

तो देत नाही प्रतिक्रिया कुठल्याच गोष्टीवर
आभाळात ध्रुव तारा राहतो कायम एकाच दिशेवर

माझ्या सवांदात असते कधीतरी आक्रोशाची तळमळ
पाहिलीय तेव्हा त्या शांत झाडावर थोडीशी पानांची सळसळ

सवांद लांबतो, तरी तो थांबतो, राहतो ऐकत
त्या दिपस्तंभा समोर मी जातो नश्वर वादळी लाटे सारखा फुटत