***** येशील कधी ....? *****

Started by Shri_Mech, July 07, 2016, 11:33:11 PM

Previous topic - Next topic

Shri_Mech

येशील कधी ....?


तुला वेळ नाही
मला चैन नाही
विचार जात नाही
खेळ चालूच राही


वाचून कविता संपल्या
मनाला मनवून झाले
प्रेमभावनांना माझ्या
दिलासे देऊन झाले


तुझी वाट पाही
नायनातले पाणी
हाका अंतरीच्या
वेशीत पिंगा घाली


टाळणे तुझे खटकले
ओल्या मनात मुरले
अनुत्तरित प्रश्न माझे
वाट पाहून पेंगुळले


तू गप्प का अशी
अडलीस कश्या पाशी
संदिग्धता ही कसली
आसक्त मी तुझ्यापायी


प्रेमात तुझ्या मी
पुरता वेडावलो
ध्येये विसरून सारी
तुझ्या सावलीत विसावलो


दुर्लक्ष तुझे कळेना
कशावर आधारलेले
कुठल्या पापात न्हालो
कसा अस्पृश्य झालो


सतत वाहत राही
डोळ्यातील धबधबा
आठवणींचे पीक येई
ओसाड धर्तीवर माझ्या


कधी येशील या माळावर
सजवून हास्य चेहऱ्यावर
उधळशील जीवनात बहर
तुझ्याच वाटेवर लागलीये नजर

Shri_Mech
Shri_Mech